उद्गीरीचे सरपंच पांडुरंग पाटील यांचे अल्पश: आजाराने निधन
शित्तूर तर्फ वारुण (शिवाजी नांगरे ) : शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी चे लोकनियुक्त सरपंच श्री पांडुरंग बंडू पाटील वय ३५ वर्षे यांचे अल्पश: आजाराने निधन झाले आहे. तरुण आणि उमदं नेतृत्व अकाली मरण पावल्याने तालुक्याच्या उत्तर भागातून हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने सरपंच पांडुरंग पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

सरपंच पाटील हे तरुण आणि मनमिळाऊ नेतृत्व असल्याने त्यांच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांना पहिल्या पसंती ची मते मिळाली होती. ते नेहमीच आपल्यात राजकीय उद्देश आणू न देता सर्वसामान्य जनतेला सामाजिक बांधिलकी जपत वागणूक देत होते. त्यामुळे त्यांच्याविषयी ची लोकप्रियता वाढत होती.

कमी वयात त्यांचं झालेलं निधन त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्यासारखे आहे. तसेच या तरुण नेतृत्वाचा मित्र गोतावळा सुद्धा मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा एक भलीमोठी पोकळी निर्माण झाली आहे.