सामाजिक

उद्या दि.५ सप्टेंबर पासून पुन्हा एकदा बांबवडे बंद :


बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी उद्या दि. ०५ सप्टेंबर पासून पाच दिवस पुन्हा एकदा बंद होत आहे. कोरोना संक्रमणाचा वाढता धोका बांबवडे गावाला मोठ्या प्रमाणावर भासू लागल्यामुळे, बांबवडे व्यापारी असोसिएशन च्या वतीने उत्स्फूर्त बंद चा निर्णय घेतला आहे. सदरच्या निर्णयावर ग्रामपंचायत बांबवडे कोरोना समितीने शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे बांबवडे बाजारपेठ पूर्णतः बंद रहाणार आहे.
जसे बांबवडे बाजारपेठ सुरु झाली, तसे लोकांचा लोंढा बांबवडे च्या दिशेने वाढू लागला. यात फक्त लोकांचा च दोष आहे असा नाही, काही चुका आपण सुद्धा सुधारणे गरजेचे आहे. अत्यावश्यक च्या नावाखाली भरणा जर सुरु राहील, तर मात्र या बंद ला अर्थ रहाणार नाही. तेंव्हा समितीने ‘ बंद ‘ करताना याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर परिसर निर्जंतुक करण्यासाठी सुद्धा उपाय योजना कराव्यात. अन्यथा केवळ बंद करून त्याचा उपयोग होणार नाही. याची दक्षता घ्यावी.
दरम्यान पंचक्रोशीतील जनतेने या बंद ची नोंद घेवून बांबवडे कडे येणे टाळावे, असे आवाहन समितींच्या वतीने करण्यात येत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!