सामाजिक

उद्या बांबवडे त “न्यू फ्रेंड्स मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक्स ” चे सकाळी १०.०० वा.उद्घाटन


बांबवडे : युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायामध्ये लक्ष घातल्यास नोकरीपेक्षा अधिक आर्थिक कमाई होवू शकते. हे उदाहरण लक्षात ठेवून येथील तरुणांनी नवा व्यवसाय उभा केला आहे. तो व्यवसाय म्हणजे ” न्यू फ्रेंड्स मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक्स ” . हा नवीन व्यवसाय बांबवडे तालुका शाहुवाडी येथील कोठावळे इमारतीमध्ये नव्याने सुरु होत आहे. उद्या दि.१४ मार्च रोजी सकाळी १० वाजता “न्यू फ्रेंड्स मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक्स ” ह्या नव्या व्यवसायाचे उद्घाटन होत आहे.

त्यांच्या या व्यावसायिक प्रगतीसाठी साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांचे मनापासून अभिनंदन, आणि शुभेच्छा.


बांबवडे तालुका शाहुवाडी इथं पहिल्यांदा केवळ मोबाईल रिचार्ज चा व्यवसाय करीत असलेले युवक व्यवसायाला पुढे नेत आहेत. कधी काळी मोबाईल रिचार्ज चा व्यवसाय करता, करता मोबाईल विक्री चा व्यवसाय सुरु केला, आणि उद्या याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स च्या व्यवसायामध्ये उतरत आहेत.


हा नवा व्यवसाय येथील संदीप शेळके व अमोल लाटकर या तरुण मित्रांनी सुरु केला आहे. या व्यवसायाचे उद्या सकाळी १० वाजता उद्घाटन आहे. या तरुण युवकांच्या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी सगळ्यांनाच आमंत्रित केले आहे. तेंव्हा उद्या सकाळी दहा वाजता कोठावळे इमारत मध्ये आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संदीप शेळके व अमोल लाटकर यांनी केले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!