उसवलेल्या संसारांना सेना व सहकाऱ्यांचा मदतीचा धागा : पूरबाधितांना मदत
बांबवडे : कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शाहुवाडी तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. मुळे काडी-काडी ने विणलेला संसार उध्वस्त झाल्याची परिस्थिती तालुक्यातील काही भागात निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती ज्याठिकाणी निर्माण झाली,त्याठिकाणी शिवसेना,ज्योतिर्लिंग एन्टरप्राईजेस- आनंदराव भेडसे व त्यांचे सहकारी सीएचएच इंडिया प्रा.लि- प्रकाश पाटील, डी.पी. फॅसिलिटी सर्व्हिसेस – संगीता पाटील, डी.एम.ग्रुप ऑफ कंपनीज धनंजय पाटील या दातृत्ववान मंडळींनी तेथील मंडळींचा संसार पुन्हा सुरु करण्याच्या दृष्टीने मदतीचा हात पुढे केला आहे.



तालुक्यातील करंजफेण, पाल, सावर्डी आदी ठिकाणी पूरबाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले आहे.


यावेळी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शाहुवाडी- पन्हाळा विधानसभा मतदार संघ संपर्कप्रमुख आनंदराव भेडसे, उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, तालुकाप्रमुख दत्ता पोवार, शाहुवाडी पंचायत समिती सभापती विजय खोत, पंचायत समिती सदस्य, उपतालुका प्रमुख दिनकर लोहार, शाखाप्रमुख विक्रम पाटील, अलका भालेकर, तसेच शिवसेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शिवसैनिक, युवसैनिक, व ग्रामस्थ उपस्थित होते.