एकनिष्ठतेची पोचपावती मिळावी- श्री जयवंतराव पाटील
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हापरिषदेची उमेदवारी मिळावी,आणि त्या माध्यमातून एकनिष्ठतेची पोचपावती द्यावी.अशी आग्रहाची मागणी जयवंतराव महादेवराव पाटील साळशीकर हे विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे सावकार यांच्याकडे करीत आहेत. अशी माहिती श्री जयवंतराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना जयवंतराव पाटील पुढे म्हणाले कि, गेली ११ वर्षे आम्ही सावकार साहेबांचा आदेश इमाने इतबारे मानत आलो आहोत. इच्छा असो व नसो, ते सांगतील त्या उमेदवाराला आम्ही सहकार्य केले आहे. यावेळेस सुदैवाने बांबवडे मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राखीव झाला आहे.
या मतदारसंघातून उमेदवारी देवून, आमच्या पाठीवर यशाचा आशीर्वाद द्यावा. अशी देखील मागणी केली आहे. ज्या उमेदवारांनी अनेक वेळा गट तट बदलले आणि आपल्या नेत्यांशी प्रतारणा केली. अशांना संधी न देता, प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी. गाव तसेच पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्ते आम्हाला पाठींबा द्यायला तयार आहेत. त्याचबरोबर आमचे वडील माजी शिक्षण सभापती श्री महादेवराव ज्ञानदेव पाटील हे एक प्रामाणिक बुजुर्ग व्यक्तिमत्व आहे. त्यांचा देखील जनसंपर्क दांडगा आहे. त्या जनसंपर्काचा आपल्याला निश्चितच फायदा होईल. याची आम्हाला खात्री आहे. आम्हाला उमेदवारी दिल्यास जीवाचे रान करू. बांबवडे जिल्हापरिषद मतदारसंघ निश्चित कायमस्वरूपी आपल्यासोबत राहील. याबद्दल शंका नाही. आमच्या वडिलांचा या पंचक्रोशीतील ३० ते ३५ गावांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि गेली बरीच वर्षे या संबंधांचा वापर आम्ही स्वत:साठी केलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारी आम्हाला मिळालीच पाहिजे, अशी आग्रहाची मागणी जयवंतराव पाटील आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते सावकार साहेबांकडे करीत आहोत. असेही जयवंतराव पाटील यांनी सांगितले.