एक तपाच्या एकनिष्ठतेला संधी मिळेल- जयवंतराव पाटील
बांबवडे : एक तपाच्या एकनिष्ठतेचे फळ आम्हाला निश्चितच मिळेल. असे मत बांबवडे जिल्हापरिषद मतदार संघाचे इच्छुक उमेदवार श्री जयवंतराव महादेवराव पाटील साळशीकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
जयवंतराव पुढे म्हणाले कि, मी एका प्रस्थापित गटाशी बंड केले. घरातील ज्येष्ठ मंडळींची नाराजी पत्करून आमदार विनय कोरे यांच्या गटात प्रवेश केला. गेली १२ वर्षे सावकार साहेबांशी एकनिष्ठ राहून ते देतील, त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार केला. त्यासाठी अनेक जणांची नाराजी पत्करली.
आज बांबवडे जिल्हापरिषद मतदार संघातून मी इच्छुक आहे. या मतदारसंघाची नाळ आम्हाला माहित आहे. वडिलांच्या सभापती पदाच्या काळापासून राजकारण जवळून पाहिले आहे. आणि त्याचा अभ्यास देखील केला आहे. आपले बलाबल कुठे आहे, आणि कुठे नाही, याचा अभ्यास केला आहे. त्यामुळे यशाची निश्चितच खात्री आहे. समोरच्या उमेदवाराची कमजोर नस कुठे आहे, याचा अभ्यास केला आहे. या सगळ्यांची गोळाबेरीज करता, यश फार लांब नाही. याबाबत सावकार साहेब या सगळ्यांचा विचार नक्की करतील, याची खात्री आहे. अनेक तरुण मंडळे संपर्कात आहे.या सगळ्यांचा निश्चितच सावकार साहेब विचार करतील. गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड यांचेसुद्धा मार्गदर्शन निश्चीत मिळेल, याची खात्री आहे. असे सुद्धा श्री जयवंतराव पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
