‘ एक रकमी एफआरपी ‘ मागणी साठी “उदय साखर” ला स्वाभिमानी संघटनेचे निवेदन
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील उदय सह.साखर कारखान्याचे अथणी शुगर युनिट नं. २ यांना गत हंगामातील दुसरा हफ्ता ७०/३० फॉर्मुला नुसार जादा २००/- रु. देण्यात यावे. तसेच कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चालू गळीत हंगामातील एक रकमी एफआरपी देण्यात यावी, या मागणी चे निवेदन साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड दादा यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे, शाहुवाडी-पन्हाळा विधानसभा अध्यक्ष वसंत पाटील, शाहुवाडी तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, जयसिंग पाटील चरणकर, अवधूत जानकर, अजित साळोखे, अमर पाटील, रामभाऊ लाड, रायसिंग पाटील, आण्णा मगदूम, संपत पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.