एक समाजशील व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड : रंगराव वाघमारे यांचं निधन
बांबवडे : सोनवडे तालुका शाहुवाडी येथील रंगराव शंकर वाघमारे ( वय ७१ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
रंगराव वाघमारे हे हिंदुस्तान पेट्रोलियम मधून सेवा निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, पुतण्या उत्तम वाघमारे, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी A १०२ न्यूज, संतोष अपार्टमेंट,चिंचपाडा रोड, आय्यापा मंदिर जवळ कल्याण पूर्व इथ आहे.
वाघमारे साहेब एक समाजशील आणि दानशूर व्यक्तिमत्व होते. एखाद्याने आपली व्यथा सांगावी, आणि आण्णांनी त्यावर मार्ग काढला नाही. असे कधी झाले नाही. त्यांची तालुक्याच्या मातीशी नाळ जुळलेली होती. म्हणून तालुक्यातील माणूस मुंबईत आला, असे त्यांना समजले कि, ते त्या माणसाला आवर्जून भेटायचे,त्याची विचारपूस करायचे. हा आमचा वयैक्तिक अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी सोनवडे इथ पंचशील तरुण मंडळाची स्थापना १९८५ साली केली . या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, कि, बुद्ध पौर्णिमा यावेळी विविध स्पर्धा मंडळाच्या माध्यमातून घ्यायचे. तसेच गरीब आणि होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करायचे. हि त्यांची सामाजिक बांधिलकी असायची. सुमारे चाळीस वर्षे एखाद्या मंडळाचे अध्यक्ष पद भूषविणे, हि सोपी बाब नाही. असं हे समजशील व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. पुनश्च त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो , हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
