एन.डी.आर.एफ. जवानांची पूरपरिस्थिती बाबत प्रात्याक्षिके
शिराळा प्रतिनिधी(संतोष बांदिवडेकर):शिराळा तालुक्यात मोठी पर्जन्यवृष्टी होते. यामुळे शिराळा तालुक्यात वारणा नदीकाठच्या २१ गावांना या पुराचा फटका बसतो. या पार्श्वभूमीवर शिराळा तहसील कार्यालय येथे एन. डी. आर. एफ. च्या २३ जवानांच्या तुकडीने आपत्कालीन प्रसंगी करावयाच्या उपाययोजना संदर्भात प्रशिक्षणा सह प्रात्यक्षिके करून दाखवली.
यावेळी तहसीलदार शामला खोत-पाटील म्हणाल्या,जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील २१ पूरग्रस्त नागरिकांनी येणाऱ्या आपत्तीला कशा प्रकारे सामोरे जावे यासाठी एन. डी. आर. एफ. २३ जवानांच्या पथकाच्या माध्यमातून प्रात्यक्षिके दाखवून प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये पूर आल्या नंतर व पूर परिस्थिती उद्भवल्यावर कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात. बचावाची परिस्थिती कशी निर्माण करायची व आत्मनिर्भय कसे बनायचे याची माहिती देण्यात आली.
यावेळी वेगवेगळ्या परिस्थितीशी कसा सामना करावयचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
यावेळी एन.डी.,आर.एफ.टीम कमांडर सर्वेश उपाध्याय ,हवलदार संदीप पावर,महसूल नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, निवासी नायब तहसीलदार हसन मुलाणी, गटविकास अधिकारी संतोष राउत,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील, तालुक्यातील २१ पूरग्रस्त भागातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी ,मंडळ अधिकारी , आशा स्वयंसेविका,अशा गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका ,आपदा मित्र, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.