सामाजिक

एफआरपी जाहीर करा, अन्यथा ९ डिसेंबर रोजी ” काटा बंद ” आंदोलन : स्वाभिमानी शेतकरी संघटना

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील उदय सह.साखर कारखाना तथा अथणी शुगर्स लि. च्या वतीने नव्याने तुटलेल्या ऊसाला पहिली उचल किती देणार हे जाहीर करावे, अन्यथा ९ डिसेंबर पासून ” काटा बंद ” आंदोलन करण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अथणी शुगर्स यांना देण्यात आले आहे.

२०२३-२४ वर्षाचा गळीत हंगाम सुरु होवून महिना उलटला आहे. तरीही कारखान्याने पहिली उचल जाहीर केलेली नाही. जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गत हंगामात तुटलेल्या ऊसाला प्रती टन १००/- रुपये व चालू हंगामात तुटलेल्या उसाची एफ.आर.पी. + १००/- रुपये असा फार्मुला ठरलेला असतानाही अद्याप कारखान्याने एफ.आर.पी. ची रक्कम जाहीर केलेली नाही. हि रक्कम त्वरित जाहीर करावी, अन्यथा ९ डिसेंबर रोजी काटा बंद आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.


या निवेदनावर स्वाभिमानी चे सुरेश म्हाऊटकर, जयसिंग पाटील, अवधूत जानकर, गुरुनाथ शिंदे, भैय्या थोरात, अजित साळोखे, रामभाऊ लाड, मनीष तडवळेकर, शामराव पाटील आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!