एसपीएस न्यूज यु ट्यूब चॅनेल मध्ये रूपांतरण
बांबवडे : सह्यद्री च्या कुशीत सुरु असलेलं एसपीएस न्यूज वेब पोर्टल सध्या एसपीएस न्यूज यु ट्यूब चॅनेल मध्ये रुपांतरीत होत आहे.
गेले महिनाभर काही अपरिहार्य कारणास्तव हे पोर्टल बंद होतं. या काळात ज्यांनी फोनद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून धीर दिला. त्यास्तव अशा हितचिंतकांचे मनस्वी आभार. एका वाईट क्षणातून चांगल्या भविष्याचे पाऊल टाकत आहोत. आपण यु ट्यूब चॅनेल माध्यमातून जनतेसमोर येत आहोत. त्या दृष्टीने सकारात्मक पावले पडत आहेत. लवकरच आपण नव्या स्वरुपात जनतेसमोर येत आहोत. यामध्ये जाहिराती सुद्धा व्हिडीओ स्वरुपात प्रदर्शित करणार आहोत. यामुळे आपला व्यवसाय ग्राहकांपर्यंत आणखी प्रभावीपणे पोहोचणार आहे. याची जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. त्यांनी केलेले आजवर चे सहकार्य लाखमोलाचे आहे.याबद्दल त्यांचे धन्यवाद.लवकरच यु ट्यूब आपल्या सेवेत दाखल होत आहे. आभार.