कणेरी मठाच्या ” प्रतिकारशक्ती मात्रा ” चे गणेश मंडळाच्यावतीने गणेशनगर मध्ये वाटप
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील गणेशनगर च्या गणेश कला,क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी, कोल्हापूर येथील श्री काड्सिद्धेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या प्रतिकारशक्ती मात्रा चे वाटप करण्यात येत आहे. इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री गणेश कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
नागरिकांनी रिकाम्या बाटल्या आणून प्रतिकारशक्ती मात्रा नेवून घरातील पाण्यात टाकावी. एक लिटर च्या बाटली मध्ये प्रतिकारशक्ती मात्रा चे १२ थेंब टाका. १५ वर्षांवरील व्यक्तींनी २५० मिली मात्रा टाकलेले पाणी दिवसातून दोन वेळा घ्यावे. तसेच १५ वर्षाखालील मुलांनी १२५ मिली मात्रा टाकलेले पाणी दिवसातून दोन वेळा घ्यावे.. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.तेंव्हा इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असेआवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.