करंजफेण येथील धावडा खिंडीत भूस्खलन : प्रशासनाची तातडीची कारवाई
येळवण जुगाई प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील दक्षिण भागाकडे असलेल्या करंजफेण येथील धावडा खिंडीत मध्यरात्रीच्या दरम्यान भूस्खलन झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर पहाटे पासून मातीचे ढिगारे दूर करण्यात आले असून, वाहतूक सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसात शाहुवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने, तालुक्यातील अनेक ओढे, नाले, नद्या तुडुंब भरून वहात आहेत. तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे करंजफेण इथं भूस्खलन झाले आहे. हा डोंगर भाग असून ,या भागात पावसाचा नेहमीच सर्वाधिक जोर असतो. गेल्यावर्षी सुद्धा इथं भूस्खलन होवून, येथील पेट्रोल पंप मातीच्या ढिगाऱ्याखाली गेला होता. त्यावेळी पेट्रोल पंप मालकाची वित्तहानी झाली होती. परंतु त्यावेळी सुद्धा कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती.

आज पुन्हा एकदा तालुक्यातील या गावाच्या हद्दीतील धावडा खिंड इथं भूस्खलन झाले आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी जावून येथील मातीचे ढिगारे हलवले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे.