गुन्हे विश्वसामाजिक

करंजोशी येथील बॉक्साईत डेपो इथं एकाचा खून – आरोपी ताब्यात


बांबवडे : करंजोशी तालुका शाहुवाडी येथील म्हसोबा पॅाईंट जवळ असलेल्या बॉक्साईट संकलन डेपो इथं दोन ऑपरेटर मध्ये झालेल्या शिवीगाळ आणि मारामारीत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर गुन्ह्याची नोंद शाहुवाडी पोलीस ठाणे इथं करण्यात आली आहे.


शाहुवाडी तालुक्यातील म्हसोबा पॅाईंट जवळ असलेल्या बॉक्साईट संकलन डेपो इथं दिनांक २५ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता झालेल्या व्हील लोडर अक्षय गावकर व पोकलँड ऑपरेटर सहदेव यादव यांच्यात झालेल्या हाणामारीत अक्षय गावकर ठार झाला. हे दोघेही भूमी रिसोर्सेस प्रायव्हेट लि. या कंपनीमध्ये भाडेतत्वावर असलेल्या मशिनरी वर कामास होते.


यातील मयत अक्षय गावकर याने आरोपी सहदेव थाणु यादव राहणार कोटवारटिह पोस्ट चंदवारा ता. चंदवारा, जि. कोडरमा राज्य झारखंड याला आई बहिणी वरून अश्लील शिवीगाळ केली. याचा रग मनात धरून त्याने जवळच असलेल्या लोखंडी पाईप ने मयत अक्षय गावकर याच्या कपाळावर, तसेच कानाच्या मागील बाजूस जीवे मारण्याच्या अद्देशाने मारहाण केली यात अक्षय गावकर यास जीवे ठार मारले.


यातील मयात अक्षय गावकर अंदाजे वय २९ वर्षे रहाणार रामनगर,तालुका जोयडा, जि. कारवार, राज्य कर्नाटक येथील आहे. सदर घटनेची फिर्याद भूमी रिसोर्सेस प्रायव्हेट लि. या कंपनी चे सुपरवायझर बसवराज कल्लाप्पा पाटील वय ३९ वर्षे मुळ पत्ता सिंगीगखोप तालुका खानापूर जि. बेळगाव, सध्या तानाजी चावरे यांच्या घरी शाहुवाडी,तालुका शाहुवाडी जि. कोल्हापूर रहात आहेत.


दरम्यान शाहुवाडी पोलीस ठाण्याकडून आरोपी सहदेव यादव ला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुवाडी पोलीस ठाणे करीत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!