करुंगली इथं महिला संघाच्यावतीने ग्राम स्वच्छता अभियान
आरळा प्रतिनिधी ( सागर नांगरे ) : करुंगली तालुका शिराळा इथं २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त ग्राम स्वच्छता अभियान, महिला ग्रामस्थ, व जय शिवराय महिला ग्राम संघ यांनी राबविले.

करुंगली इथं या महिलांनी गावातील गल्ली तसेच परिसराची स्वच्छता केली. यामध्ये सरपंच दिपालीताई पाटील, उपसरपंच रुख्मिणी पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

या स्वच्छता अभियान मध्ये संघाच्या व्हीआरपी मिनल मुंद्रलाकर , एफएलएस सीआरपी अर्चना चव्हाण, ,तसेच अध्यक्षा संगीता गुरव, सचिव आम्रपाली नांगरे, कोशाधीश सीमा गुरव, लिपिका सुमित्रा नायकवडी , तसेच गावातील सहकारी महिला देखील उपस्थित होत्या.