कर्णसिंह गायकवाड दिनदर्शिका २०२२ प्रकाशन सोहळा संपन्न
बांबवडे : श्रीमंत कर्णसिंह गायकवाड (सरकार ) विचार मंच च्या वतीने कर्णसिंह गायकवाड दिनदर्शिका २०२२ ची निर्मिती केली असून, आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते त्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बांबवडे-डोणोली इथं असलेल्या आयटीआय च्या सभागृहात या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड उपस्थित होते.

या दिनदर्शिकेमध्ये स्व.आमदार संजयदादा यांच्या कार्यप्रणालीचे वैशिष्ट्य नमूद केले आहेत. तर दादांनी शाहुवाडी तालुक्यात बांधलेल्या लघुपाटबंधारे तलाव यांचे फोटो व माहिती देण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील सर्व यात्रांचे विवरण करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील महत्वाचे दिवस, मुद्दे यांची देखील माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

स्व. माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड साहेब यांची देखील माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे.

या प्रकाशन सोहळ्यास महादेवराव पाटील, विष्णू पाटील, पंचायत समिती चे माजी उपसभापती पंडितराव नलवडे, सुभाषराव इनामदार, बाळासाहेब गद्रे, अमरसिंह खोत पंचायत समिती सदस्य, सयाजी निकम, विष्णू पाटील डोणोली, शाम कांबळे, शिवाजी घोटूगडे, मानसिंग खोत, संदीप पाटील, धनराज लाड सोशल मिडिया प्रमुख, भरतराज भोसले, विद्यानंद यादव, वीरधवल पाटील, संभाजी मोहिते, दिपक पाटील, दिग्विजय डवंग, दिग्विजय गायकवाड, सुहास कोल्हापुरे, व विचार मंच चे इतर युवा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.