कर्णसिंह गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा – एसपीएस न्यूज
बांबवडे प्रतिनिधी : कॉंग्रेस पक्षाचे शाहुवाडी तालुक्यातील युवा नेते, व गोकुळ दुध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

स्व.आमदार संजयसिंह गायकवाड यांचे थोरले चिरंजीव म्हणजे कर्णसिंह गायकवाड. संजयदादा यांच्या अनेक विकासकामांचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. त्यांनी दादांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी नव्या पिढीचे शिलेदार गोळा केले आहेत. याचबरोबर जुने नेते मंडळी सोबत आहेतच. त्यात आत्ता गोकुळ चे संचालक पद त्यांना मिळाले आहे. त्याच्या माध्यमातून विकासकामे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भविष्यात एक चांगले नेतृत्व तयार व्हायला हरकत नाही.

अशा या स्व. आमदार संजयसिंह गायकवाड यांचे सुपुत्र असलेले कर्णसिंह गायकवाड यांना मुकुंद पवार आणि परिवार यांच्याकडून पुनश्च वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.