राजकीयसामाजिक

कर्नाटकी मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन : शिवसेना स्टाईल ने उत्तर देवू- श्री. गिरी


शाहुवाडी : कर्नाटकी भाजप शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सन्मानाने विराजमान करावा, अन्यथा कर्नाटकात घुसून, शिवसेना स्टाईल ने उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गिरी यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कर्नाटकातील भाजप शासनाने ऐन मध्यरात्री हटविल्याने संपूर्ण कोल्हापुरात भाजप शासनाविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने कर्नाटकातील भाजप चे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे मलकापूर तालुका शाहुवाडी, इथं दहन करण्यात आले, व तेथील भाजप शासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी श्री नामदेव गिरी पुढे म्हणाले कि, भाजप शासनाला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर नाही. त्यांनी छत्रपतींच्या नावाचा केवळ राजकारणापुरताच वापर केला आहे. नाहीतर कर्नाटकात भाजप पक्षाचे सरकार असतानाही, अशी आगळीक घडली नसती. या मंडळींना निव्वळ महाराष्ट्राचा दुस्वासच आहे. हे कर्नाटकी शासन नेहमीच सीमाबंधावांच्या मराठी माणसांच्या विरोधात राहिले आहे. महाराष्ट्रात केवळ सत्तेसाठी छत्रपतींचे नाव वापरणाऱ्या या शासनाला महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. येत्या आठ दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सन्मानाने विराजमान करा, अन्यथा शिवसेना तेथील शासनाला शिवसेना स्टाईल ने उत्तर देईल, असेही श्री. गिरी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
या आंदोलनावेळी तालुकाप्रमुख दत्ता पोवार, नगरसेवक सुहास पाटील मलकापूर नगरपरिषद, शहरप्रमुख बाबुराव चांदणे, हरीश पाटील, बांबवडे शहरप्रमुख सचिन मूडशिंगकर, विजय लाटकर, तुषार पाटील, यांच्यासह तमाम शिवसैनिक, पदाधिकारी, शिवप्रेमी जनता मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!