काळुंद्रे चे सागर पाटील यांचा वारणा नदीत बुडून मृत्यू
शित्तूर तर्फ वारुण (शिवाजी नांगरे) : शित्तूर तर्फ वारुण येथील वारणा नदीच्या पात्रात सागर तानाजी पाटील राहणार काळुंद्रे ता. शिराळा जि. सांगली यांचे प्रेत आढळून आले. याबाबतची वर्दी सचिन तानाजी पाटील रहाणार काळुंद्रे यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यात आज दि.२९/०१/२०२१ रोजी सकाळी दहा वाजणेच्या दरम्यान दिली आहे.

दरम्यान घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार सागर तानाजी पाटील वय ३० वर्षे राहणार काळुंद्रे ता. शिराळा हा युवक ट्रॅक्टर ड्रायव्हर होता. दरम्यान त्याच्या नावावर कर्ज होते. त्यामुळे तो अस्वस्थ होता. तसेच त्याला फिट येत असल्याची माहिती देखील घटनास्थळावरून मिळाली आहे. पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सागर पाटील यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.


सदर घटनेचा अधिक तपास शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्री. माने करीत आहेत.