कुंपण च शेत खातंय ..? .: बांबवडे तील डमी गर्भपात प्रकरण
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं आनंद हॉस्पिटल वर सापळा रचून कारवाई करण्यात आली होती.
हि कारवाई आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त रीत्त्या केली असे समजते. परंतु पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नाही, म्हणून संबंधित संशयित आरोपीस अटक केलेली नाही. रात्री उशिरा तक्रार नोंद झाल्याने संशयितास पळून जाण्यास संधी मिळाली.
याबाबत जनतेतून साशंकता व्यक्त केली जात आहे. करण जे पथक कारवाई करते,त्या पथकाने संबंधितास अटक करण्याकरिता केलेला उशीर हा अक्षम्य आहे. यावरून संबंधित पथकच संशयाच्या जाळ्यात येतेय कि काय ?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस ठाणे त तक्रार नोंद नसल्याने अटक केली नाही, असे सांगत आहे. परंतु पथकाची कारवाई होताना जरी तक्रार केलेली नसली, तरी कारवाई ची माहिती पोलीस प्रशासनास होती. मग संशयित आरोपीस अटक न करता, किमान ताब्यात घेता येत नाही का ? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
संशयित आरोपी ने या अगोदर अनेक गर्भपाताची प्रकरणे केली असल्याची कबुली एका व्हिडीओ क्लिप मध्ये दिली आहे. दरम्यान गर्भपात करण्यासाठी डमी पेशंट आणला असताना, तो गर्भपात केलेला नाही, असे उत्तर संघटनेचे जबाबदार पदाधिकारी सांगत असल्याने, अशा बेकायदेशीर कामे करण्यासाठी संघटना साकारली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या संघटनेतील सदस्यांना सहकार्य करावे, परंतु ते काम कायदेशीर असावे, परंतु बेकायदेशीर कामाला एखादी संघटना साथ देत असेल तर, हे डॉक्टर पेशासाठी दुर्दैव आहे. कारण समाज डॉक्टर मंडळींकडे देवदूत म्हणून पहात असतो. अशावेळी बेकायदेशीर काम करण्यापासून सदस्यांना रोखले पाहिजे, हे अलिखित असतानाही, संबंधित पदाधिकारी बेकायदेशीर कामांना पाठीशी घालत आहेत, हे दुर्दैव आहे. असो.
एकंदरीत काय हे प्रकरण दडपण्याचा तर प्रयत्न होत नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. त्यामुळे कुंपण च शेत खातंय काय ? असा प्रश्न सुद्धा निर्माण होवू लागला आहे.
,