कु. पूजा शेळके यांचे स्वामी कलेक्शन च्या वतीने अभिनंदन – श्री चौगुले बंधू
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील श्री आनंदराव शेळके या प्राथमिक शिक्षकांची कन्या कु. पूजा आनंदराव शेळके यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ३० व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिचे बांबवडे येथील ” स्वामी कलेक्शन ” चे मालक चौगुले बंधू यांनी पूजा शेळके यांचे फेटा बांधून अभिनंदन केले. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने कु. पूजा शेळके यांचे मनस्वी अभिनंदन.

कु. पूजा शेळके यांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत ३० व्या क्रमांकावर त्यांची वर्णी लागली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकारी वर्ग १ या स्थानी वर्णी लागली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल स्वामी कलेक्शन बांबवडे येथील मोठ्या वस्त्र दालनाचे मालक चौगुले बंधू यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्यासोबत डोणोली ग्रामस्थ व श्री आनंदराव शेळके यांचे मित्र परिवार यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले.