केंद्रशाळा माण इथं वाचन प्रेरणा दिन संपन्न
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील केंद्रीय शाळा माण इथं माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती चे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन, व वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने केंद्रीय प्राथमिक शाळा माण चे पदवीधर अध्यापक डॉ. संजय जगताप यांनी स्वत: लिहिलेली पुस्तके सर्व विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिली.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना वाचनाची आवड होती. ती जोपासण्यासाठी त्यांनी काही काळ वृत्तपत्र विक्री देखील केली होती. वृत्तपत्र विक्रेता दिन च्या अनुषंगाने शाहुवाडी वृत्तपत्र विक्रेता श्री. अनिल कारंडे यांचा खास सन्मान करण्यात आला.

” हात धुवा ” दिनाचे औचित्य साधून संजय जगताप यांनी हात धुण्याची प्रात्यक्षिके देखील दाखवली. तर हात न धुतल्यास काय परिणाम होतात, त्याचे विवेचन संभाजी लोहार यांनी केले.

यावेळी शाहुवाडी पंचायत समिती च्या गटशिक्षणाधिकारी सौ. जयश्री जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी श्री सदाशिव थोरात, माण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कैलास वसावे, यांचे मार्गदर्शन लाभले.


यावेळी माण चे मुख्याध्यापक श्री अनिल कुलकर्णी, विषय शिक्षक बाळू कस्तुरे, अध्यापक बाबुराव शिंदे, पांडुरंग माने, अध्यापिका माधवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.