केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल दि.२४ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा न्यायालयाकडून जमीन मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे नारायण राणे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला,तर श्री राणे यांनी ‘ सत्यमेव जयते ‘ असे ट्वीट करून सूचक वक्तव्य केले आहे .

काल रात्री महाड न्यायालयाकडून १५ हजार रुपये जातमुचलक्या वर नारायण राणे यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली.यानंतर रात्री उशिरा राणे मुंबईत पोहचले. जामीन मिळाल्यामुळे राणे यांना जरी दिलासा मिळाला असला, तरी नाशिक पोलिसांनी २ सप्टेंबर ला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.