‘ केडीसी ‘ च्या रणांगणात रणवीरसिंग विजयी- माजी.आम सत्यजित पाटील यांची मोलाची साथ
बांबवडे : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचाच वरचष्मा राहिला आहे. चुरशीच्या झालेल्या शाहुवाडी तालुक्याच्या मतदानात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचे चिरंजीव रणवीरसिंग गायकवाड यांनी विकास सेवा संस्था गटातील एकूण ९९ मतांपैकी ६६ मते मिळवून बाजी मारली आहे. तर विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले.



एकंदरीत बँकेचा निकाल पुढील प्रमाणे :
बिनविरोध निवड : १. नाम. हसन मुश्रीफ, २. नाम. सतेज पाटील, ३.आम. पी.एन. पाटील, ४. आम. राजेश पाटील, ५. ए. वाय. पाटील, ६.अंमल महाडिक .
विकास सेवा संस्था गट : १. शिरोळ – नाम. राजेंद्र पाटील-यड्रावकर , २.पन्हाळा- आम. डॉ. विनय कोरे. ३.शाहुवाडी- रणवीरसिंग गायकवाड,४. भुदरगड – रणजितसिंह पाटील, ५.आजरा- सुधीर देसाई, ६.गडहिंग्लज- संतोष पाटील.
प्रक्रिया गट- खास. संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर.
इतर मागासवर्गीय गट- विजयसिंह माने,
पतसंस्था गट- अर्जुन आबीटकर,
भटक्या विमुक्त जाती/ जमाती : स्मिता गवळी,
इतर शेती संस्था गट- भैय्या माने,
महिला गट : श्रुतिका काटकर, निवेदिता माने
अनु.जाती/जमाती- आम. राजू बाबा आवळे
या एकूण निवडणुकीत शाहुवाडी तालुक्यात शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांची साथ सुद्धा रणवीरसिंग गायकवाड यांना लाभली. यामुळे हा निकाल याशास्वीरीत्त्या संपन्न झाली, असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.