कै. नारायण शेळके फ्रेंड्स सर्कल च्यावतीने श्री गणेश मंडळाचे हार्दिक अभिनंदन
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ ( झेंडा चौक ) या मंडळास जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. या मंडळा ला नामदार आशिष शेलार यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
याबद्दल मंडळाचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स,एसपीएस न्यूज दैनिक किल्ला या वृत्तपत्र समूहाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा.
महाराष्ट्र राज्य शासनामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५ या स्पर्धे मध्ये श्री गणेश मंडळास कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. डोणोली ग्रामस्थांच्या वतीने मंडळाचे हार्दिक अभिनंदन. तसेच कै. नारायण शेळके फ्रेंड्स सर्कल डोणोली या मंडळाच्या वतीने सुद्धा श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ( झेंडा )या मंडळाचे हार्दिक अभिनंदन .असे मंडळाच्या च्या वतीने सांगण्यात आले.