कोरोना काळातील जिगरबाज सभापती हंबीरराव पाटील बापू
बांबवडे : कोल्हापूर जिल्हा परिषद चे आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी कोरोना संक्रमण काळात आपल्या पदाचा खऱ्या अर्थाने सर्व सामन्य जनतेला उपयोग करून दिला आहे. त्यांनी तालुक्यातील कोविड सेंटर तसेच त्यांच्या मतदारसंघातील वाड्या-वस्त्या वरच्या लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, अहोरात्र परिश्रम करून, आपल्या पदाचे चीज केले. यामुळे सर्व सामान्य वर्गातून त्यांच्याविषयी समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या काळात खऱ्या अर्थाने गरज लागली ती सर्वसामान्य जनतेला. आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रत्येक आरोग्य कर्मचारी झटत होताच, परंतु त्यांच्यासोबत पदाधिकारी म्हणून हंबीरराव बापू यांनी सुद्धा आपली भूमिका चोख निभावली. यावेळी कोण कोणत्या गटाचा आहे, हे न पाहता त्यांना आरोग्याची सुविधा मिळणे गरजेचे आहे, याकडे प्राधान्याने लक्ष दिले.

श्रीमंत ,गरीब, राजकीयदृष्ट्या आपला, परका याकडे लक्ष न देता, या मंडळींनी कोरोना संक्रमणाचा खडतर काळ मोठ्या हिमतीने निभावला. त्यांच्यासोबत आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स ,आरोग्य कर्मचारी, हि मंडळी सुद्धा वेळेची पर्वा न करता राबली, म्हणूनच तालुक्यातील कोरोना आटोक्यात आला.

अशा जिगरबाज कोरोना योद्धा ठरलेल्या आरोग्य सभापती हंबीरराव पाटील उर्फ सर्व सामान्यांचे बापू यांना त्यांच्या सेवेबद्दल विनम्र अभिवादन.