खंडोबा तालीम मंडळांकडून नव सैनिकांचा सत्कार व शुभेच्छा सोहळा संपन्न
बांबवडे :कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी व सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मिळून सुमारे १२५ च्यावर युवक सैन्यात भरती झाले आहेत. त्यापैकी सुमारे ३० जणांचा सत्कार बांबवडे येथील खंडोबा तालीम मंडळ यांनी शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देवून करण्यात आला. विशेष म्हणजे हि बाब निवडणुकीच्या धामधुमीत पुढारी मंडळींच्या कानापर्यंत पोहचली आहे, कि, नाही , हे अद्याप माहित नाही.
यावेळी शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे, डोणोली, शित्तूर तर्फ मलकापूर, गोगवे, सावे, आदी गावातील तरुण सैन्यात भरती झाले आहेत.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महेश निकम तात्या यांनी केले.
यावेळी सुभेदार मेजर संदीप देसाई यांनी आपल्या मार्गदर्शन पर मनोगतात नव सैनिकांना सैन्यातील नियम, मेहनत आणि आव्हाने यांची माहिती दिली. यावेळी निवृत्त सैनिक महेश निकम तात्या यांनी देखील उपस्थित सैनिकांना मार्गदर्शन केले. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते या नव सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुभेदार पदावरून सुभेदार मेजर पदावर पदोन्नती झाली. यास्तव त्यांचा देखील संदीप देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी खंडोबा तालीम मंडळ चे अध्यक्ष अभिजित निकम, उपाध्यक्ष अंकुश निकम यांच्यासहित मंडळाचे कार्यकर्ते उपस्थीत होते. उपस्थितांचे आभार पत्रकार मुकुंद पवार यांनी मानले.
