” खाजगी सुरक्षा रक्षक आले म्हणजे पोलीस कर्तव्यातून सुटले ? ” : बांबवडे येथील परिस्थिती
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात सध्या कडक निर्बंध राबवण्यासाठी खाजगी सुरक्षा रक्षक ग्रामीण भागातून फिरताना दिसत आहेत. बांबवडे इथं ” मार्शल कमांडो ” चे पथक सकाळी ९ ते संध्या ६ वाजेपर्यंत कार्यरत असते.

सध्या राज्यात शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. हे सर्व सामान्य नागरिकांसाठी असूनही, अनेकजण ह्या निर्बंधांना आपल्या हटवादी भूमिकेतून हरताळ फासण्याचा प्रयत्न करताना सुरुवातीला दिसत होते. दरम्यान गावातील समिती साठी हा वादाचा मुद्दा होवून बसला होता. परंतु खाजगी सुरक्षा रक्षकांची टीम आयोजित केल्यामुळे, ग्रामपंचायतीचा हा मुद्दा निकालात निघाला आहे. तसेच या सुरक्षा रक्षकांमुळे नियमांची अंमलबजावणी होताना दिसत आहे.

यामुळे पोलीस खाते मात्र निवांत झाले आहे. आत्ता आपली जबाबदारी संपली, या अविर्भावात निदान बांबवडे दूरक्षेत्र पोलीस ठाणे तरी निवांत आहे. यांची कधी गस्त नाही, कि चौकीच्या बाहेर काय चालले आहे, याचे सोयरसुतक सुद्धा येथील पोलीस कर्मचाऱ्यांना आहे, असं वाटत नाही. कारण चौकीत कुणी आले तरी साधी विचारणा करण्याचे सौजन्य सुद्धा येथील पोलीस दाखवताना दिसत नाहीत.

एकंदरीत काय खाजगी सुरक्षा रक्षक आले म्हणजे पोलीस आपल्या कर्तव्यातून सुटले, असेच चित्र इथं निदर्शनास येत आहे.