खासदार शेतकऱ्यांच्या बांधावर : खासदार धैर्यशील माने
बांबवडे : शेतकऱ्याचे एक टक्का सुद्धा नुकसान होवू नये,याची पंचनामे करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये,यासाठी लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून घ्यावेत. शेतकरी अगोदरच कोरोना संक्रमणामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला आहे.


शेतकऱ्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे,तेन्त्यांना शाकीय योजनेचा शंभर टक्के लाभ मिळावा,यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशा आशयाचे वक्तव्य खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे. अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकरी राजा अडचणीत आला आहे.त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्याकरिता खासदार शाहुवाडी पन्हाळा आणि शिराळा तालुका दौऱ्यावर होते. यावेळी पाहणी करीत असताना त्यांनी वरील उद्गार काढले.

ते पुढे म्हणाले कि, अगोदरच कोरोना संक्रमणामुळे शेतकरी अर्थार्जनाच्या संकटात सापडला आहे. त्यातून बाहेर निघत असताना, अतिवृष्टीचे संकट आले. हातातोंडाशी आलेल्या या भागातील भात व नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार ३३ टक्के जरी नुकसान झाले असले तरी शंभर टक्के गृहीत धरून पंचनामे करावे,जेणेकरून शेतकऱ्याला शासकीय योजनेचा शंभर टक्के लाभ घेता येईल. असेही खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी त्यांनी शाहुवाडी, पन्हाळा व शिराळा अशा तीन तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी ए.सी. धेडे, मंडल अधिकारी एन.एस. रणदिवे, ए. यु. सापडते, ए. के. पाटील, कृषी सहाय्यक मोहिते मॅडम, जि.प. सदस्य विजयराव बोरगे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, अनिल पाटील सुपात्रे, बळीराम ठाणेकर, राजीव अतिग्रे, सुरेश पारळे, अमरसिंह पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.