खुटाळवाडी इथं श्रमदानातून स्वच्छता अभियान मोहीम संपन्न
बांबवडे ( दशरथ खुटाळे ) : खुटाळवाडी तालुका शाहुवाडी इथं श्रमदानातून स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर जिल्हा तज्ञ श्री विजय पाटील आवर्जून उपस्थित होते.

या मोहिमेंतर्गत गावातील रस्ते, नाले यांची सफाई करण्यात आली. स्वच्छता नसेल, तर गावातील नागरिकांचे आरोग्य बिघडेल, याचा संदेश देखील देण्यात आला. तसेच कीटकनाशकांची फवारणी देखील करण्यात आली. डासांना प्रतिबंध करण्यासाठी देखील औषध फवारणी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी सरपंच विलास खुटाळे, सदस्य अमितकुमार खुटाळे, नंदाताई खुटाळे, ग्रामसेविका अस्मिता कांबळे, कर्मचारी केशव किटे, दत्ता खुटाळे, रघुनाथ खुटाळे, ज्ञानदेव किटे, विकास खडके यांची उपस्थिती होती.

यावेळी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.