खुटाळवाडी जवळ झालेल्या अपघातात कडवे चा दुचाकीस्वार ठार
बांबवडे ( दशरथ खुटाळे ) : खुटाळवाडी तालुका शाहुवाडी येथील ख्रिश्चन वसाहत जवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, अज्ञात वाहनचालक आपल्या वाहनासहित पसार झाल्याचे समजते.

घटनास्थळावरून, मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार शैलेश बेंडकळे हा हिरो होंडा दुचाकी क्र. MH 02- EA-8101 ya duchakivarun कोल्हापूर दिशेला निघालेला होता. खुटाळवाडी येथील ख्रिश्चन वसाहत जवळ आज दि. ४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजनेच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने या दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात शैलेश जयवंत बेंडकळे( वय ३५ वर्षे ) रहाणार कडवे तालुका शाहुवाडी हा युवक जागीच ठार झाला आहे.

दरम्यान कडवे येथील ठार झालेल्या या युवकाचे वडील जयवंत बेंडकळे यांचा सहा महिन्यापूर्वी मृत्यू झाला, तर आई एक महिन्यापूर्वी निधन पावली आहे. शैलेश च्या पश्चात एक अविवाहित भाऊ कुटुंबात आहे.

शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह कोल्हापूर इथं पाठविण्यात आला आहे.