खुटाळवाडी प्रकरणातील, सुपात्रे येथील एक इसम पॉझीटीव्ह
बांबवडे : खुटाळवाडी ता.शाहुवाडी येथील पॉझीटीव्ह इसम यांच्या कॉंटॅक्ट लिस्ट मधील सुपात्रे ता.शाहुवाडी येथील एका इसमाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.
तरी बांबवडे पंचक्रोशी तील जनतेने काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक सर्व उपाय काळजीपूर्वक करावेत.
सध्या गेल्या चार महिन्यांपासून कोरोना ने थैमान घातले आहे. बड्या बड्या लोकांचे आर्थिकमान अडचणीत आले आहे, तर सर्वसामान्य जनतेने काय करावे? हा प्रश्न सामान्य जनतेसमोर आवासून उभा आहे. त्यात सुरु झालेला लॉकडाऊन गोरगरीब जनतेला अनेक समस्या वाढवणारा आहे. लोकांच्या आर्थिक स्थितीचा विचार शासनाने, आणि सर्वच कोरोना समितीने करणे, गरजेचा आहे. लोकांना घरी रहा, सुरक्षित रहा, हा सल्ला श्रीमंत लोकांसाठीच लागू होतो. कारण अत्यावश्यक गरजांमध्ये सामील असलेल्या गोष्टी त्यांच्याकडेच विकत मिळतात. ते विकत घेण्यासाठी पैसे आणायचे कुठून?, रेशन वरच्या गहू आणि तांदळाने सर्व होते, हा शासनाचा गोड गैरसमज आहे. गोरगरीब जनतेचे करायचे काय ? या प्रश्नाचा ग्राउंड लेवल ला उतरून विचार करावा लागणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी सुद्धा आता बाहेर येणे, गरजेचे आहे.