खुटाळवाडी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी श्री विलास खुटाळे ,तर व्हा. चेअरमनपदी संतोष किटे
बांबवडे : खुटाळवाडी तालुका शाहुवाडी येथील खुटाळवाडी विविध कार्यकारी विकास सेवा संस्था, खुटाळवाडी च्या चेअरमन पदी कर्णसिंह गायकवाड गटाचे खंदे समर्थक व लोकनियुक्त सरपंच श्री विलासराव श्रीपती खुटाळे यांची तर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाचे संतोष किटे यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश लाड यांनी काम पाहिले.
खुटाळवाडी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली.