” खेळ कुणाला दैवाचा कळला ” : विशाल काळे यांचे निधन
बांबवडे : आमचे जिवलग मित्र विशाल कृष्णा काळे यांचे अल्पश: आजाराने दुखद निधन झाले आहे. त्यांच्या आठवणींना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज, व मुकुंद पवार आणि परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ , बहिण असा परिवार आहे. रविवार दि.१२ मे रोजी सकाळी ९.०० वा. शिंपे ता.शाहुवाडी इथ जलदान विधी संपन्न होणार आहे.
विशाल काळे हे भावनिक आणि हृदयस्पर्शी व्यक्तिमत्व होते. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स च्या परिवारामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते. अशा हृदयस्पर्शी व्यक्तिमत्वाला त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली. एवढ्या लवकर आयुष्याचा प्रपंच संपवून विशाल गेल्याने त्यांच्या कुटुंबावर, तसेच मित्र परिवारावर फार मोठा आघात झाल्याची मानसिकता मित्र परिवाराने व्यक्त केली आहे.
युवराज काळे, अशोक काळे, प्रवीण शिंदे, संपत पाटील, निवृत्ती बनसोडे, सुधीर कुलकर्णी, दशरथ खुटाळे, ओंकार पवार, तृप्ती पवार, सौ . मंजिरी पवार आणि परिवार अशा अनेक मित्र मंडळींच्या वतीने देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. हीच प्रार्थना .