गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मलकापूर नगर परिषद मध्ये बैठक संपन्न
मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील मलकापूर नगरपरिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शाहुवाडी पोलीस ठाणे व मलकपूर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील व नगर परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विद्या कदम होते.

यावेळी शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी मंडळाच्या सभासदांना संबोधन केले. यावेळी त्यांनी स्पीकर लावणे, त्यांचा आवाज नियंत्रित ठेवणे, मंडपामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्या. तसेच गणेशोत्सव काळात कोणाशी वाद होणार नाही, याची काळजी घ्या. तसेच गणेशोत्सव काळात स्पीकरचा आवाज रात्री बारा वाजेपर्यंतचा असावा. तसेच मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या सर्व अटी व नियमांची माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी पोलीस कर्मचारी संजय काशीद, दिगंबर चिले, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.