गायकवाड घराण्याने हरितक्रांती केली- सौ राजकुँवर रणवीरसिंग गायकवाड (वहिनीसाहेब )
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे जिल्हापरिषद मतदारसंघात गायकवाड कुटुंबियांचे वारे फिरू लागले आहे. एकूण २६ गावातून मतदारांच्या भेटी झाल्या आहेत.
या मतदारसंघात गायकवाड घराण्यातील एक नवा चेहरा सौ राजकुँवर रणवीरसिंग गायकवाड यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसमोर आला आहे.

सौ राजकुँवर मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचबरोबर गायकवाड घराण्याने आजवर केलेला धोरणात्मक विकास याची त्यांनी मतदारांना उजळणी करून दिली.
यावेळी त्या म्हणाल्या कि, तालुक्यात झालेली हरितक्रांती याच्या पाठीशी गायकवाड घराणे आहे. त्याचबरोबर तालुक्यात उभारला गेलेला एकमेव साखर कारखाना हा मानसिंगराव गायकवाड दादा यांच्या परिश्रमातून उभारला गेला आहे. अशी अनेक धोरणात्मक कामे दादांनी केली आहेत. केडीसिसी बँकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना तीस हजार रुपयांचे कर्ज देण्याचे काम संचालक रणवीरसिंग गायकवाड साहेब यांनी केले आहे. त्याचबरोबर आण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून तरुणांच्या बेरोजगार हातांना व्यवसायासाठी कर्ज देवून मजबूत करण्याचे काम केले आहे.
अशाच अनेक विकासकामांना उर्जितावस्था देण्यासाठी घड्याळ चीन्हासामोरील बटन दाबून मला तसेच अभयसिंह चौगुले यांना निवडून द्यावे. त्याचबरोबर पिशवी पंचायत समिती मधील अधिकृत उनेद्वर सौ लक्ष्मी बाबुराव पाटील यांचे चिन्ह सुद्धा घड्याळ आहे. त्यांच्या घड्याळ चीन्हासामोरील बटन दाबून त्यांना देखील भरघोस मतांनी निवडून द्यावे. तसेच आम्हाला विकास करण्याची संधी द्यावी. असेही आवाहन सौ राजकुँवर गायकवाड यांनी मतदारांना केले आहे.
