गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या अगणित गुरूंना विनम्र अभिवादन
बांबवडे : गुरुपौर्णिमा म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली सांस्कृतिक विचारांची परंपरा आहे. इथं नातं आहे गुरूशी, शिष्याचं , आणि शिष्याचं गुरूशी .हे नात केवळ शिक्षण किंवा प्रशिक्षणासाठी नाही, तर हे नातं आहे एका पवित्र आत्म्यानं सर्वस्वाचं केलेलं समर्पण सिद्ध करण्याचं. हि परंपरा अगदी मानव जातीच्या निष्पन्नांपासून आहे.

याचदिवशी शिष्यानं आपल्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा दिवस आहे एका ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्वाची आठवण करण्याचा. या जगात आपण सर्वांनी आपल्याकडे असलेलं ज्ञान कुणाकडून तरी घेतलेलं असतं. आज त्याचीच कृतज्ञता आपण या गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने व्यक्त करतो.

याठिकाणी कुणीही गुरु असू शकतो. अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत. अगदी अदृश्य व्यक्ती किंवा संकल्पना सुद्धा असू शकते. अशा संकल्पनांना विनम्र अभिवादन.