गॅस ग्राहकांना केवायसी व सुरक्षा तपासणी बंधनकारक..
शिराळा प्रतिनिधी : सर्व गॅस ग्राहकांना केंद्र शासनाने केवायसी सक्तीची केली आहे.जर केवायसी केली नाही तर कदाचित पुरवठा बंद होऊ शकतो.तसेच गॅस तपासणी करून घेणे बंधनकारक केले आहे त्यामुळे गॅस ग्राहकांनी केवायसी व तपासणी करून घ्यावी, त्याचप्रमाणे सिलेंडर घेण्यासाठी आधी बुकींग करावे आवाहन महाजन कन्सर्न्सच्या भागिदार सौ.सुखदा महाजन यांनी केले आहे.
हिंन्दुस्थान पेट्रोलीयम कार्पोरेशन लि व केंद्र शासनाने गॅस वितरणामधे सुसूत्रता यावी यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.यासाठी केवायसी बंधनकारक केली आहे.लवकरच गॅस ग्राहकांनी सिलेंडर बुक केल्यानंतर ओटीपी येणार आहे तो ओटीपी दाखवल्यावर सिलेंडर मिळणार आहे.त्यामुळे सर्व ग्राहकांनी केवायसी ,सुरक्षा तपासणी व सिलेंडर भरून मिळण्यासाठी बुकींग करावे असे आवाहन एच.पी.गॅस वितरक महाजन कन्सर्न्सच्या भागिदार सौ.सुखदा महाजन केले आहे.गेले पाच महिने महाजन कन्सर्न्स ने आपल्या कार्यक्षेत्रात कॅम्प लावून केवायसी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे पण अनेकानी केवायसी पूर्ण केली नाही.त्यामुळे आमच्या कार्यक्षेत्रातील व जिल्ह्यातील अन्य एजन्सीच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांनी केवायसी व सुरक्षा तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.केवायसी नसेल तर कदाचित शासन सिलेंडर पुरवठा थांबवण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेल्या तीन सिलेंडर मोफत योजनेचाही लाभ मिळणार नाही अशी शक्यता नाकारतां येत नाही व तसे झाले तर महाजन कन्सर्न्स व जिल्ह्यातील गॅस एजन्सी जबाबदार राहाणार नाहीत.
त्याच प्रमाणे अनेक गॅस ग्राहकांचे एजन्सीकडे नोंद असलेले फोन नंबर बदलले आहेत किंवा बंद आहेत अशा ग्राहकाने आपले फोन नंबर रजिस्टर करून घ्यावेत.नंबर रजिस्ट्रर नसेल तर बुकींग करता येणार नाही व ओटीपी येणार नाही.ओटीपी नसेल तर गॅस कर्मचारी सिलेंडर देणार नाहीत ग्राहकांनी हि सर्व प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी अशी विनंती सौ.महाजन व जिल्ह्यातील गॅस वितरकांनी केली आहे.हिन्दुस्थान पेट्रोलीयम कार्पोरेशन .. एच.पी.कंपनीने बुकींगसाठी अत्यंत सोपे नंबर दिलेले आहेत.९४९३६०२२२२ या नंबर वर ग्राहकाने मिसकॅाल दिला तर बुकींग आपोआप होते( मोबाईल नंबर एजन्सीमध्ये रजिस्टर पाहिजे )त्याचप्रमाणे ८८८८८२३४५६ या वरून सिलेंडर बुक करता येतो.त्याचप्रमाणे ९२२२२०११२२ या व्हॅाटॲप वरून बुकींग करता येते.हि प्रक्रिया कांही मिनटांची आहे त्यामुळे गॅस ग्राहकांनी सिलेंडर बुक करून घ्यावा असे आवाहन केले आहे.केवायसी, बुकींग करणे आणि गॅस सुरेक्षेबाबत तपासणी करणे हे गॅस कंपनीने वितकांराना सक्तीचे केले आहे.हिन्दुस्थान पेट्रोलीयम कार्पोरेशन लि कंपनी भारत सरकारच्या अघिपत्याखाली काम करते त्यामुळे कंपनीच्या सुचनेनुसार गॅस वितरकांना काम करावे लागते कांही वेळा स्थानिक प्रशासन,जिल्हा प्रशासन यांना याची माहिती नसते.त्यामुळे समाजात कांही वेळा गैरसमज पसरले जातात.पण गॅस ग्राहकाच्या सुरक्षेला गॅस कंपनी व केंद्र शासन प्राधान्य देते.यासाठी कंपनीच्या नियमानुसार गॅस कनेक्शन सुरक्षीत आहे का ? याची तपासणी तज्ञ मॅकॅनिक द्वारे केली जाते.गॅस गळती होऊन एखादी दुर्घटना घडली तर याची जबाबदारी कोणाची ? म्हणून ग्राहक व समाजाच्या सुरक्षेच्या काळजीपोटी गॅस तपासणी महत्वाची आहे.ही तपासणी सध्या मोफत असून सुरक्षापाईप बदलल्यास दीडशे रूपये आकारले जातील .देशात गेल्या वर्षी गॅस गळतीमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत.या सर्वाचा विचार करून गॅस ग्राहकांनी गॅस तपासणी करून घ्यावी असे आवाहन सुमंत महाजन यांनी केले आहे.
——————- चौकट——————
विविध हॅाटेल, खानावळ चहा नाष्टा गाडे असे व्यवसाय करणार्या सर्व व्यवसायिकांनी व्यावसायिक (१९ कि.गॅ ) चे सिलेंडर वापरणे बंधनकारक आहे.पण अनेक व्यावसायिक हा मोठा सिलेंडर वापरत नाहीत.हा गुन्हा आहे.पुरवठा अधिकारी,तहसिलदार यांना हॅाटेल अथवा व्यवसायाच्या ठिकाणी घरगूती सिलेंडर सापडला तर व्यवसायिकावर गुन्हा दाखल होऊन सिलेंडर जप्त केला जातो.त्यामुळे सर्व हॅाटेल चालक व व्यावसायिकानी व्यवसायासाठी मोठा( १९ कि.ग्रॅ.) सिलेंडर वापरावा असे आवाहन सौ.महाजन यांनी केले आहे.