गेल्यावर्षीच्या तुलनेत मृत्यू दर अधिक असल्याने माणूस म्हणून काम करणे गरजेचे- श्री अनिलकुमार वाघमारे
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, इथं यावर्षी गेल्या फेज च्या तुलनेत मृत्यू चा दर अधिक आहे. तेंव्हा सर्व प्रशासन व गाव कोरोना समिती मिळून काम करू या . आणि माणूस म्हणून जगू या. असे भावनिक उद्गार येथील गटविकास अधिकारी श्री अनिलकुमार वाघमारे यांनी काढले.

बांबवडे येथील ग्रामपंचायत च्या सामाजिक हॉल मध्ये प्रशासकीय अधिकारी, गाव कोरोना समिती व व्यापारी यांच्यामध्ये कोरोना च्या वाढत्या संक्रमणाबाबत बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी होते. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री विजय पाटील, आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी एच.आर. निरंकारी, जि.प. सदस्य विजयराव बोरगे,तर बांबवडे गावचे लोकनियुक्त सरपंच सागर कांबळे यांच्यासहित विष्णू यादव, सुरेश नारकर, अभयसिंग चौगुले, सचिन मुडशिंगकर, व संचालक मंडळ उपस्थित होते.

यावेळी श्री वाघमारे यांनी तालुक्यातील कोरोना संक्रमणाच्या वाढत्या संख्येबाबत आपल्या भाषणातून चिंता व्यक्त केली. सगळ्यांनी एकत्रितरीत्या काम केल्यास आपण हि दुसरी लाट आपल्या पुरती का होईना आवरू शकतो. सध्या माण आरोग्यवर्धिनी केंद्रात कोविड सेंटर उभे केले आहे. सध्या १२३ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले असून, पैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू दर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक आहे. तेंव्हा सर्वानीच एकजुटीने काम करणे गरजेचे आहे.

दरम्यान व्यापारी मंडळींनी , स्वॅब तपासणी करून घ्यावी, जे अत्यावश्यक नियमामध्ये राहून दुकान उघडू शकतात. स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय दुकान उघडू नये, तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण उपलब्धतेनुसार करून घ्यावे, अशा सूचना देखील श्री वाघमारे यांनी केल्या.

यावेळी कोरोना समिती यांनी पोलीस प्रशासनाचे सहकार्य होत नसल्याचे सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री विजय पाटील म्हणाले कि, इथून पुढे असे होणार नाही. आमचे अधिकारी पूर्ण वेळ इथं थांबतील. प्रत्येक दोन-तीन दिवसानंतर पोलीस व कोरोना समितीसोबत बैठक होईल. पोलिसांचे सर्व सहकार्य कोरोना समिती ला राहील.
यावेळी जि.प.सदस्य विजयराव बोरगे म्हणाले कि, पोलिसांनी सहकार्य केल्यास, बांबवडे येथील होणारी गर्दी आपोआप आवाक्यात येईल. परंतु पोलिसांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.

यावेळी एच.आर. निरंकारी म्हणाले कि, सध्या माण इथं कोव्हीड सेंटर उभारले असून, त्यानंतर अल्फोन्सा इंग्लिश मिडीयम स्कूल, त्यानंतर भेडसगाव आरोग्यवर्धिनी केंद्र, व सगळ्यात शेवटी एन.डी.पाटील महाविद्यालय इथं सुद्धा कोव्हीड सेंटर उभारणार आहोत. यावेळी माहिती देताना निरंकारी म्हणाले कि, काल दि.१६ एप्रिल पर्यंत एकूण रुग्ण १२३ निष्पन्न झाले असून, १९ जनांना डिस्चार्ज मिळाला असून,७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच बांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रात स्वॅब तपासणी केंद्र सुरु केले आहे. आवश्यक रुग्णांनी स्वॅब तपासणी करून घ्यावी.

यावेळी अनेकांनी आपले प्रश्न विचारले असून, त्यांच्या शंकांचे समाधान उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.

यावेळी सर्कल, तलाठी, आरोग्य विभाग, शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार शेळके, ग्रामसेवक वरेकर, शिक्षक विठ्ठल गुरव, जयसिंग पाटील, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष बाळासाहेब खुटाळे, यांच्यासोबत व्यापारी वर्ग, गावातील मान्यवर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

यावेळी आभार मानताना सरपंच सागर कांबळे म्हणाले कि, प्रशासनाने केवळ ग्रामसमिती वर अवलंबून न राहता पोलीस, महसूल विभाग यांनी सुद्धा सहकार्य करणे गरजेचे आहे.