गोकुळ च्या निवडणुकीत सेनेच्या नेत्यांचे फोटो परवानगीशिवाय नको – श्री नामदेव गिरी
बांबवडे : गोकुळ च्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाशिवाय त्यांचे फोटो प्रचार करण्यासाठी कोणालाही वापरता येणार नाही, कारण शिवसेना पक्षाचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी गोकुळ च्या निवडणुकीत नाही. असे असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो प्रचार निवेदनावर लावला आहे. हे चुकीचे आहे, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.


सध्या कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ च्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. तेंव्हा प्रत्येक पक्ष या निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय आहे. परंतु या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाने अद्याप कोणताही आदेश दिलेला नाही. तेंव्हा अशावेळी गोकुळ च्या कोणत्याही उमेदवाराने शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो परवानगीशिवाय प्रचार पत्रावर लावू नये. कारण या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढवावी, असेही सांगितले नाही. याबद्दल माजी आमदार सत्यजित पाटील यांनीसुद्धा हि भूमिका मांडल्याचे नामदेव गिरी यांनी सांगितले.