गोगवे च्या बागेचा मळा इथं बिबट्याच्या हल्ल्यात १९ मेंढरं ठार
बांबवडे (दशरथ खुटाळे ) : शाहुवाडी तालुक्यातील गोगवे व बजागेवाडी च्या हद्दीवरील बागेचा मळा इथं बिबट्याने मेंढरांच्या कळपावर आज संध्याकाळी हल्ला झाला. या हल्ल्यात १९ मेंढरं ठार झाली असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळत आहे.
याबाबत घटनास्थंळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कि , गोगवे तालुका शाहुवाडी येथील आनंदा केशव पाटील यांच्या टेकावरील शेतात बांबवडे, सोनवडे, सरूड इथ राहणाऱ्या मेंढपाळांची १९ मेंढरं या हल्ल्यात ठार झाली आहेत.
येथील मेंढपाळ संजय बंडगर, विलास मुंडरे, बाळू वग्रे, अवघड वग्रे, काशिनाथ जानकर यांचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. असे ग्रामस्थांतून बोलले जाते. वरील मेंढपाळांची मेंढरे बागेचा मळा इथ बसावयास होती. आज सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून १९ मेंढरांना ठार केले.
या घटनेची माहिती वनविभागाला कळतांचं वनक्षेत्र अधिकारी श्री अमित भोसले, कर्मचारी यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला सदर च्या घटनेने पंचक्रोशीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पंचक्रोशीतून होत आहे.