गोगवे दगड्फेकीतील गंभीर जखमी महिलेचे निधन : आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा
बांबवडे : गोगवे तालुका शाहुवाडी येथील भिंतीच्या बांधकामावरून झालेल्या दगडफेकीत शालन पाटील या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारार्थ कोल्हापूर इथं दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार घेत असताना, शालन पाटील यांचे आज निधन झाले. दरम्यान या मारहाणीत अद्याप सर्व आरोपींना अटक न झाल्याने, कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. आणि या प्रकरणामध्ये सर्व आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली. अन्यथा पोलीस ठाण्यासमोर उग्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी कुटुंबीयांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केली.

याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, दि. २४ ऑक्टोबर च्या दिवशी भिंतीच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला. व त्याचे पर्यावसन दगड मारण्यात झाले. ते दगड शालन पाटील यांना लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारार्थ कोल्हापूर इथं दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची फिर्याद रोशन शिवाजी पाटील वय २८ वर्षे यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. यामध्ये किरण जालिंदर पाटील, मच्छींद्र आकाराम पाटील, संगीता मच्छींद्र पाटील, गौरव गोरक्ष पाटील या चौघांविरोधात फिर्याद देण्यात आली होती. यापैकी फक्त किरण यास ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्याविरोधात शाहुवाडी पोलीस ठाण्यात कलम ३२६, ३२४, ३३८, ५०४, ५०६ दाखल करण्यात आले होते. आज शालन पाटील यांच्या मृत्यू झाल्याने यामध्ये ३०२ कलमाचा समावेश करण्यात आला असल्याचे बांबवडे पोलीस चौकीतून समजले.

या अनुषंगाने सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असे रोशन पाटील परिवाराच्यावतीने एसपीएस न्यूज शी बोलताना सांगण्यात आले.