सामाजिक

गोरक्षनाथ दिंडीसाठी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या वतीने भोजन

शिराळा/प्रतिनिधी :-
शिराळा तालुक्यातून ४ जुलै रोजी श्री महायोगी गुरु गोरक्षनाथ दिंडीने प्रस्तान केले होते.१०तारखेला मायणी ता. खटाव येथील सरुताई मंदिर येथे पोहचली .यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या वतीने भोजन देणेत आले. यावेळी गोरक्षनाथ मंदिराचे आनंदनाथ महाराज व दिंडी प्रमुख यांना हार शाल श्रीफळ देऊन दिंडीचे स्वागत माजी मंत्री शिवाजीराव नाईक व जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक यांच्या हस्ते करण्यात आले तर विना पूजन सौ.सुनंदा नाईक यांचे हस्ते करण्यात आले.


श्री महायोगी गुरु गोरक्षनाथ दिंडीने पायी चालत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. गोरक्षनाथ दिंडी मध्ये पूर्वीपासूनच पुरुष वारकऱ्यांच्याबरोबर महिलांचाही मोठा सहभाग होता.


” ज्ञानोबा माऊली तुकाराम ” चा गजर करत निघालेल्या या दिंडीचे शिवाजीराव नाईक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कडून उत्स्फूर्तपणे स्वागत केले. डोक्यावर तुळशी वृंदावन व कलश घेतलेल्या महिला ही दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या. टाळ मृदंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा गजर करत उत्साह आणि आनंदमय वातावरणात आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी या दिंडीमध्ये डोक्यावर भगवे फेटे व पांढरी टोपी परिधान करून वारकरी सहभागी झाले होते. गावातील प्रमुख मार्गावरून ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, सत्यजित नाईक, अभिजीत नाईक,सुखदेव पाटील , विजय पाटील,सौ सुनंदा नाईक, सौ. देवयानी नाईक, सौ. वेदांतिका नाईक, राजेश्वरी नाईक, सुवर्णा नाईक, अनिता नाईक, बाबासो पाटील, विश्वास पाटील , उत्तम (बंडा) डांगे ,गोरख पवार, दत्ता तडाके, जितेंद्र देसाई, दीपक पवार, बाबा परीट, सागर पाटील, राजू दसवंत,काका केसरे, पोपट पटेकरी,आधी मान्यवर उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!