ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वसोयींनी युक्त शिक्षण लाभणार -प्राचार्य यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील पालक आपल्या पाल्यांसाठी सर्व सोयींनीयुक्त शाळेच्या शोधात असतील ,तर तशा पालकांनी या बातमीकडे थोडं लक्ष द्यावं. कारण श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली तालुका शाहुवाडी इथं आपला शोध नक्कीच संपेल, असे मत शाळेचे प्राचार्य श्री सचिन जद सर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

ते आपल्या शाळेविषयी बोलताना,शाळेकडे असणाऱ्या अनेक सोयी आणि सुविधा यांबाबत बोलताना पुढे म्हणाले कि, आमच्याकडे सर्वांगीण शिक्षण , कला, क्रीडा, संस्कार याबरोबर अभ्यासक्रमातील उच्चस्तर जोपासला जातो. तसेच इथं असलेला शिक्षकवृंद ९ ते १० वर्षांहून अधिक अनुभवी आहे. इथलं शिक्षण नियमबद्ध असून, विद्यार्थ्याला उत्तम सवयी लावल्या जातात, तसेच विद्यार्थ्याच्या आवडीनुसार शिक्षण दिले जाते. इथं संपूर्ण अभ्यासक्रमातील वर्षात अभ्यासक्रमाशी निगडीत २०० हून अधिक उपक्रम राबविले जातात.

पालक, विद्यार्थी, व शिक्षक यांच्यासाठी प्रत्येक महिन्याला सेमिनार , व्याख्याने, पालक मेळावे यांचे आयोजन केले जाते. शिष्यवृत्ती परीक्षा, चित्रकला ग्रेड परीक्षा, प्रज्ञा शोध परीक्षा,अशा अनेक स्पर्धा परीक्षा व बाह्य परीक्षांचे वयैक्तिक मार्गदर्शन वर्ग इथं भरविले जातात. या शाळेची १० वी बोर्डाची १०० टक्के निकालाची परंपरा आहे. इथं १० वी त गेलेला विद्यार्थी नापास होणार नाही,अशी तयारी करून घेतली जाते. तसेच येथील १० वी चा ८० % विद्यार्थी ,८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून, उत्तीर्ण होत असल्याची येथील परंपरा आहे. इथं सुसज्ज ग्रंथालय असून, सुमारे ३००० पेक्षा जास्त ग्रंथ, पुस्तके, मासिके, यांच्यासहित वाचनकक्ष आहे.

विज्ञान विषयास वीस लाखांपेक्षा अधिक किमतीचे साहित्य असणारी सर्व सोयींनीयुक्त रसायनशास्त्र, जीवशास्त्र ,भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा आहे. इथं साजऱ्या केल्या जातात सर्व जयंत्या, सर्व सण समारंभ व उत्तम संस्कार वर्गांचे नियमित आयोजन केले जाते. आपली शाळा ग्रामीण भागात असल्याने, सर्वांना परवडणारी कमीत कमी फी मध्ये उतमोत्तम शिक्षण दिले जाते.

आपली शिक्षण संस्था गेल्या ५० वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवीत आली आहे. डोणोली इथं शाळेची प्रशस्त इमारत आनंददायी वातावरणात साकारली आहे. इथं समाजाभिमुख शिक्षण दिले जाते. महिलांसाठी हळदीकुंकू , तसेच पालकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ,यांसारखे उपक्रम राबवून पालकांसाठी सुद्धा खुले व्यासपीठ मिळवून दिले जाते. शाहुवाडी, पन्हाळा, शिराळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी- जाण्यासाठी सुरक्षित बस सेवा पुरविली जाते.

अशा सर्व सोयींनीयुक्त सज्ज असणाऱ्या यशवंत स्कूल डोणोली तालुका शाहुवाडी इथं इयत्ता नर्सरी ते १० वी पर्यंत चा प्रवेश आजच निश्चितच करा. अधिक माहितीसाठी कार्यालय संपर्क क्र. ८९९९४१८५२४, ९१३०९८५५००, ८५३०७७७०७३, ८१२११९०८५१. तसेच प्राचार्य : ९३०७१४०२३२. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य सचिन जद सर यांनी केले आहे.