…घे भरारी अवकाशात , संजय दादांचे सामर्थ्य तू !!!
बांबवडे : युवा नेते कर्णसिंह गायकवाड यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या वाढदिवसानिमित त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. त्यांच्या या वाढदिवसाच्या औचित्याने सामान्य कार्यकर्त्यांच्या त्यांना शुभेच्छा आहेतच, पण अपेक्षा सुद्धा आहेत. कारण ” कर्णसिंह ” म्हणजे स्व. संजय दादांचं एक निखळ प्रतिबिंब. जनता दादांना सरकारांच्या प्रतिमेत त्यांच्या निवर्तन्यानंतर सुद्धा पहात आहे.
कर्णसिंह सरकार म्हणजे संजय दादांचं दुसरं रूप. दादांच्या परतण्याची आस, आज हि इथल्या सामान्य जनतेच्या हृदयातून संपलेली नाही. नशिबाच्या थपडांनी जरी आपलं दुखणं सरकारांच्या पुढ्यात मांडलं असलं तरी, आजही ” एक धक्का और दो “असं म्हणणाऱ्यांची कमी नाही. आज सरकारांना बाजार समितीच्या अशासकीय पदावर घेतलं, हि निश्चितच अभिनंदनाची बाब आहे. परंतु स्तुती पाठक न बनता जर विचारलंत,तर माझ्या सारख्या सामान्य माणसाकडून एक प्रामाणिक मत असं येईल, कि, काहीही झालं तरी सिंह स्वत:चं अन्न म्हणजेच भक्ष्य स्वत: शिकार करून खातो, अन्यथा ठेविले अनंते तैसेची राहावे.
सरकार, तुम्ही दादांचे सुपुत्र आहात, लाथ माराल तिथे पाणी काढाल. असं तुमचं रक्त आहे. स्तुतीपाठकांची गर्दी दूर करून आत्मचिंतन केल्यास, दादा तुम्हाला मार्ग दाखवतील. ज्या अवलियाने आपली हयात लोकांना वाटण्यात घालवली, त्यांनी कुणीही दिलेलं घेण्यात आमच्यासारख्या सामान्य माणसाला बरं वाटत नाही. तुम्हाला शिकवण्या इतपत आम्ही मोठे नाहीत. किंवा आमची ती योग्यता नाही. पण जे वाटलं, ते बोलावं, असं वाटलं, म्हणून बोलत आहे. चूक झाल्यास, आपण क्षमा करालच, कारण आपण अशा एका तेजपुंज सूर्याचा अंश आहात,कि, ज्याची अवघी हयात दुसऱ्यांची घरे उजाळण्यात संपली. असो.
आजच्या आपल्या वाढदिवसाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.
तेजपुंज सूर्याचा अंश तू, हिमालयाचा सर्वोच्च बिंदू तू, अथांग सागराचा थांग तू !!
जनतेच्या हृदयातील कस्तुरी तू, सामन्यांचा मान तू , स्व. संजय दादांचा अंश तू !!
आभाळाचा भाळ तू,, क्षितिजाचा अंत तू , घे भरारी अवकाशात , संजय दादांचे सामर्थ्य तू !!!