चंद्रशेखर बावनकुळे यांचा संवाद मेळावा संपन्न
शिराळा प्रतिनिधी :-
शिराळा येथे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे कामगार मंत्री,सांगली पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख सत्यजित देशमुख यांनी दिली.
याबाबत बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले :- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिराळा या ठिकाणी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न झाला.. या मेळाव्यामध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी खा संजय काका पाटील, राज्याचे भाजपा प्रदेश संघटक मकरंद देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, भाजपा नेते, विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक, भाजपा नेते सी बी पाटील, जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष राजाराम गरुड, प्रमुख उपस्थित होते.. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.