चरण च्या वेदांत हावळे ने पटकावले गोल्ड मेडल
बांबवडे प्रतिनिधी : चरण तालुका शाहुवाडी येथील वेदांत विनोद हावळे, या ९ वी च्या विद्यार्थ्याने हरिद्वार उत्तराखंड येथील स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशन नॅशनल गेम्स मध्ये १४ वर्षे वयोगटाखालील गटामध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने हार्दिक अभिनंदन.


वेदांत हावळे यांचे कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी देखील अभिनंदन केले. याचबरोबर वेदांत चा सत्कार देखील त्यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी वसंत हावळे, विनोद हावळे, वैभव हावळे,सौरभ जांभळे, व कार्यकर्ते उपस्थित होते.