चिले महाराज समाधी मंदिर इथं यशस्वी फौंडेशन च्यावती ने मोफ़त आरोग्य शिबीर संपन्न
बांबवडे : दि. ७ मे व ८ मे रोजी यशस्वी फौंडेशन कोडोली, प्रदीप पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल खुटाळवाडी, तालुका शाहुवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प.पु.श्री क्षेत्र चिले महाराज समाधी मंदिर पैजारवाडी तालुका पन्हाळा इथं मोफतआरोग्य शिबीर व मोफत औषध वितरण संपन्न झाले.
या शिबिरामध्ये सुमारे २५० रुग्णांनी सहभाग घेतला. लाभ घेतला. यावेळी फौंडेशन च्या अध्यक्षा सौ विनिता पाटील मॅडम यांनी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री बाबासाहेब गराडे, व्यवस्थापक श्री बाबुराव गराडे, विश्वस्त श्री बळवंत घोसाळकर, श्री जयसिंग पारखे तसेच श्री बापुजी पुजारी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून या मान्यवरांचा सत्कार केला.
यावेळी अध्यक्षा सौ विनिता पाटील मॅडम यांनी मोफत आरोग्य शिबीर तसेच इतर उपक्रमांच्या माध्यमातून सेवा देण्याची ग्वाही मंदिर ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच आभार व्यक्त केले.
यावेळी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष बाबासाहेब गराडे यांनी स्व. आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला. सदर शिबिरासाठी संस्थेचे सर्वेसर्वा सचिव, आदरणीय डॉ. जयंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी यशस्वी फौंडेशन चे संचालक, सदस्य , व पदाधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका, विद्यार्थी व भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.