जठारवाडीतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले ?: पालकाची तक्रार
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील येलूर पैकी जठारवाडी येथील शिक्षक वर्गावर वेळेवर उपस्थित नसल्याचे निदर्शनास येत असून, विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा आशयाची तक्रार शाळा व्यवस्थापन समिती जठारवाडी ने शाहुवाडी पंचायत समिती मध्ये केली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, जिल्हा परिषद शाळेच्या जठारवाडी येथील शाळेत गेले ७ ते ८ दिवसापासून शिक्षक वर्गावर वेळेत उपस्थित नसतात. अशी माहिती खुद्द विद्यार्थ्यांनी येथील पालकास दिली असून, शाळा व्यवस्थापन समिती ने याबद्दल शाहुवाडी पंचायत समिती मधील कर्यालयात तक्रार केली. त्यानुसार शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुतार यांनी शाळेस भेट दिली.
संबंधिताना सूचना करून, शाळेचे वेळापत्रक राखण्याच्या सूचना केल्या.