जयसिंगराव पाटील भाडळेकर कालवश : भावपूर्ण श्रद्धांजली
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील एक बुजुर्ग नेतृत्व हरपलं आहे. दि.१८ जून २०२२ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी जयसिंगराव दत्ताजीराव पाटील भाडळेकर यांचे हृदय विकाराने निधन झाले. आज त्यांचा रक्षाविसर्जनाचा विधी संपन्न झाला. स्व. जयसिंगराव पाटील भाडळेकर यांच्या पवित्र स्मृतींना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

स्व. जयसिंगराव पाटील भाडळेकर यांनी राजकारणातील विविध पदे भूषविली होती. त्यामुळे शाहुवाडी तालुक्याच्या राजकारणात त्यांचा बऱ्यापैकी दबदबा होता. त्यांनी स्व. खासदार उदयसिंगराव गायकवाड ,तसेच बाबासाहेब पाटील सरुडकर, गटाशी त्यांची सलगी होती.